शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

Word Blank Page delete

Microsoft word वर काम करताना Blank Page डिलीट कसे करावे ?

आपण सर्वजण Microsoft Word वर काम करत असतो.परंतु बहुतेकवेळा आपल्‍याकडून enter बटण दाबले गेले तर आपल्‍याला एक नवीन Blank Page तयार होते आणि आपण जेव्‍हा Print काढतो.त्‍यावेळी आपल्‍याला blank page setting करावी लागते.
चला तर मग एक साधी सोपी पध्‍दत पाहुया.
त्‍यासाठी एक word चे document ओपन करूया.तुमचे महत्‍वाचे document लगेच घेवू नका.सरावासाठी एखादे document  घेवूया.त्‍यात 2 भरलेली पाने व enter प्रेस करून एक कोरे पान तयार करूया.

आता आपल्‍याला खालील चित्रात दाखवल्‍याप्रमाणे कृती करायची आहे.


paragraph mark यावर आपल्‍याला Click करायचे आहे.

आता आपल्‍याला सर्वात शेवटचे चिन्‍ह निवडून किंवा आपल्‍याला जे पान नको आहे त्‍याअगोदर माउस न्‍यायचा आहे.

आणि खालील चित्रात दाखवल्‍याप्रमाणे backspace बटन प्रेस करूया 


आणि आपले blank page डिलीट झाालेले दिसेल.पुन्‍हा paragraph mark बटण inactive करूया.








1 टिप्पणी:

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in